Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Woomanhood
₹199.00
कलाकाराला प्रेक्षक हवा असतो तर लेखकाला वाचक. दोन्ही मला भरभरून मिळाले आहे आणि त्यांची संख्या वर्षा गणित वाढते आहे. नाट्य देवता नटराज आणि विद्येची देवता सरस्वती ह्यांचा वरदहस्त कायम राहू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना. एकावन्न लेखांचा संच ह्या पुस्तकात शिदोरी म्हणून तुम्हाला बांधून देत आहे.
मी एक अभिनेत्री आहे त्यामुळे माझे आयुष्य अनुभवांनी भरलेले आहे. मला प्रसंग, घटना, त्यातील पात्रांमध्ये नाट्य दिसतं. आम्ही कलाकार सहिष्णू, सृजनशील राहून पुन्हा त्या घटना, प्रसंग, व्यक्तींना नाट्य रुपात उभं करू शकतो, नाटकात किंवा मग लेखणीचा आधार घेऊन. शेवटी कालिदासांनी लिहिलेल्या श्लोकातल्या शेवटच्या वाक्याप्रमाणे “नाट्यं भिन्नरुचेर्जनस्य बहुधाप्येकं समाराधनम्”, कलाकाराची कला ही रसिक प्रेक्षकांसाठी सादर केलेली कला ज्यातून उद्बोधन पर मनोरंजन व्हावे हा उदात्त हेतू आहे.
हा नाट्यमय प्रवास माझ्या लेखणीतून तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा माझा एक प्रयत्न!
Reviews
There are no reviews yet.